बऱ्याच वेळा आता संविधानाच्या शपथा घेतल्या जातात . काही दिवसांपूर्वी मला एक विवाह सोहळा attend करण्याचा योग्य आला त्यात संविधानाने धर्मग्रंथाची जागा घेतली . मला प्रथमदर्शी हे आवडलेही .
मग नंतर एक विचार आला जर संविधान हे धर्मग्रंथ झाले आणि Dr आंबेडकर हे देव झाले तर .. भक्त हेच देव निर्माण करतील . मग आधुनिक देवळं आणि अनंत प्रकारचे बडवे हि येतील . मग संस्था आणि संस्थान तयार होतील . मग या संस्था , संस्थाने आणि संस्थाचालक हे नव प्रस्थापित व्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतील . Status Quo हा त्यांना फायदेशीर असतो .
जर असे झाले तर , १९४०-५० च्या काळानुरूप बनवलेले संविधान हे अप्रचलित obsolete होईल . प्रस्थापित व्यवस्था संविधानात थोडे फार बदल घडवेल , फक्त safety valve म्हणून . पण ते बदल काळानुरूप नसतील , ते दशकांनी काळामागे असतील . आणि मग हळूहळू संविधान हे rigid होईल . जर असे झाले तर मनुस्मृती आणि संविधान यामध्ये काय फरक राहील ?
जर तर च्या दुनियेत कधीतरी constitution चे हि दहन होईल का ? आणि तसे होत असताना मी कुठे असेल ? कोण असेल ? आणि का असेल ?
मी status quoist असेल कि revolutionary ?
No comments:
Post a Comment