Cambridge Analytica (CA ) ने facebook च्या डेटा ची चोरी केली आणि त्याचा वापर US Election मध्ये trump तात्यांना झाला . असेलही .
आता भारतातही अनेक राजकीय पक्ष अशा अनेक data mining and analytics फर्म चा वापर करतात . त्यात level ऑफ sophistication मधे फरक असू शकेल , पण आता असा वापर हि inevitable गोष्ट आहे . ती टाळता येणे शक्य नाही . त्यामुळे मी नाही त्यातली असा आव कोणी आणू नये आणि जर खरेच जर एखादा राजकीय पक्ष अजून या technologies पासून दूर असेल तर त्यांनी काळाची गरज ओळखावी व लवकरात लवकर आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जावे. survival instinct म्हणून तरी .
आता प्रश्न हा आहे की गरीब राजकीय पक्षांना आणि छोट्या राजकीय पक्षांना हे परवडेल का ? सत्ताधारी पक्षाकडे आधार चा data असेल का ? जर आधार सगळीकडे लिंक झाले तर मग सत्ताधारी हे सर्वशक्तिमान होतील का ? एकाधिकारशाही बळकट होईल का ? असे झाले तर मग लोकशाही धोक्यात आली म्हणायचे का ?
हे जसा राजकीय पक्षांचं , तसाच private / govt कंपन्यांचं . ज्यांच्याकडे डेटा जास्त तेच शक्तिशाली . कारण डेटा हे नवा crude oil आहे हे भाकीत आधीच केलं गेलय . मोठ्या कंपन्या monopolist होतीलच . याचाच अर्थ competition , entreprenuership या अर्थशास्त्रातील मूळ संकल्पना नाकारल्या जातील का ? म्हणजे Capitalism धोक्यात आले असे होईल का ? अर्थशास्त्राचा सध्याचा पायाच ढासळेल का ?
आता भारतामध्ये आधार च्या स्वरूपात जगातील सर्वात मोठा database बनवला गेलाय . आधार linking मुळे तो आपल्या social , political आणि economic गरजांशी जोडला गेलाय . व्यक्तिस्वातंत्र्य ही लवचिक संकल्पना अजूनच कमकुवत होईल अशी भीती वाटण्यास वाव आहे .
एक मात्र pray करावे वाटते कि आधार चा डेटा कधी चोरी होऊ नये . असे झाले तर लोकशाही , अर्थव्यवस्था , व्याकरस्वातंत्र्य याही पेक्षा मोठा धोका निर्माण होऊ शकतो तो म्हणजे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा. George Orwell च्या Animal Farm आणि १९८४ या कहाण्या भारतात खऱ्या ठरू नये हि प्रार्थना .

