July 1, 2018

महाश्वेता

पुस्तक  समीक्षेचा एक प्रयत्न 

==================

पुस्तक  : महाश्वेता  

मूळ लेखिका : सुधा मूर्ती 
अनुवाद : उमा कुलकर्णी 
================================================================== 
महाश्वेता 
आपल्या देशी श्वेत वर्णाचे पिढ्यानंपिढ्या  उदात्तीकरण होत राहिले आहे . त्यामुळे सुंदरतेची संकल्पना ही सामाजिक स्तरावरच दूषित होत गेली आणि सुंदरतेच्या व्याख्येचा एक भ्रष्ट साचा  तयार झाला . त्या संचाबाहेरचं सर्वच कुरूप अशी दांभिक विचारसरणी बनली . याच विचारसरणीचा बळी म्हणजे महाश्वेता पुस्तकाची नायिका "अनुपमा" . सौन्दर्याच्या सर्वच मानकांत फिट बसणारी , पण कोड फुटलेली. आणि फक्त याच कारणामुळे अतिउच्चशिक्षित नवऱ्याकडून लग्नानंतर नाकारली गेलेली.  या लावण्यवती अनुपमा चा चढउताराचा प्रवास लेखिकेने सूक्ष्मपणे "महाश्वेता" मध्ये नोंदला आहे .  
स्वतःचे म्हणावे असे जे २ व्यक्ती होते ते सोडून गेल्यावर अनुपमा हतबल न होता लढण्याचा निर्णय घेते . अनुपमा खचून जाते पण तरीही मार्ग शोधते . या मार्गात अनेक अडथळे येतात पण ते अडथळेच  स्वतःसोबत  त्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती हि आणतात . एकटीचाच एक प्रवास सुरु होतो . या प्रवासात तिला नवा हवा तसा साथीदार ही चालून येतो पण नायिका ही साथीदारामध्ये मित्रच हुडकते आणि तसा मित्र तिला सापडतोही . मध्येच सोडून गेलेला नवरा अचानक माफीनाम्यासोबत भेटतो ; पश्चातापाच्या स्वग्नि मध्ये करपून निघालेला असा. पण नायिका कधीच पूर्व-विश्वाच्या पल्याड गेलेली असते ; स्वतःपुरती तरी. 
अनुपमाचा प्रवास हा प्रेरणादायी आहे . तो भावनामय स्त्रीचे व त्यासोबतच स्रीशक्तीचे दर्शन घडवतो . म्हणूनच हा प्रवास वाचक  अनुभवतो . 
या पुस्तकाचे विशेष वेगळेपण तरल भाषेत दडले आहे . अतिशय सूक्ष्म नोंदी लेखिका नोंदत असते आणि अनुवादकाराचे हि विशेष कौतुक हे कि या नोंदी अनुवादादरम्यान हरवल्या नाहीत . कर्नाटकातील - मुंबईतील पट हा स्थानिक न राहता वैश्विक होतो हेच लेखिकेचे आणि अनुवादकाराचे यश म्हणावे लागेल . त्यामुळेच "महाश्वेता" हे पुस्तकाचे नाव वाग्भटाच्या कादंबरी मधील पात्राचे नाव न रहता श्वेत वर्णाच्या अनुपमेसम सर्वच भोगी नायिकांच्या कहाणीचे प्रतीक बनते  . 


=================

Visit my parent blog https://asamiakash.blogspot.in/ for other updates. 



June 20, 2018

In search of :: शोध

 शोध सुरूय स्वतः मध्ये लपून राहिलेल्या सुप्त मनाचा .. शोध सुरूय स्वतःतील उणीवा , जाणीवांचा .. शोध सुरूय मार्गाचा आणि मार्ग बदलांच्या कारणांचा .. शोध सुरूय दैववाद की कर्मवाद याचा .. शोध सुरूय प्रश्नांचा आणि उत्तरांचाही

शोध सुरूय  शून्याचा -  अनंताचा .. शोध सुरूय  द्वैताचा , अद्वैताचा , द्वैत - अद्वैत द्वंद्वाचा ..  


.. पण अजून तरी काही सापडले नाही .. शोध सुरूय ..







===================
Visit my parent blog https://asamiakash.blogspot.in/ for other updates. 

March 22, 2018

Data

Cambridge Analytica (CA ) ने facebook  च्या डेटा ची चोरी केली आणि त्याचा वापर US Election मध्ये trump तात्यांना झाला . असेलही . 

आता भारतातही अनेक राजकीय पक्ष अशा अनेक data mining and analytics फर्म चा वापर करतात . त्यात level ऑफ sophistication मधे फरक असू शकेल , पण आता असा वापर हि inevitable गोष्ट आहे . ती टाळता येणे शक्य नाही . त्यामुळे मी नाही त्यातली असा आव कोणी आणू नये आणि जर खरेच जर एखादा राजकीय पक्ष अजून या technologies पासून दूर असेल तर त्यांनी  काळाची गरज ओळखावी व लवकरात लवकर आधुनिक तंत्रज्ञानाला शरण जावे. survival instinct म्हणून तरी . 

आता प्रश्न हा आहे की गरीब राजकीय पक्षांना आणि छोट्या राजकीय पक्षांना हे परवडेल का ?  सत्ताधारी पक्षाकडे आधार चा data असेल का ? जर आधार सगळीकडे लिंक झाले तर मग सत्ताधारी हे सर्वशक्तिमान होतील का ? एकाधिकारशाही बळकट होईल का  ? असे झाले तर मग लोकशाही धोक्यात आली म्हणायचे का ?

हे जसा राजकीय पक्षांचं  , तसाच private / govt कंपन्यांचं . ज्यांच्याकडे डेटा जास्त तेच शक्तिशाली . कारण डेटा हे नवा crude oil आहे हे भाकीत आधीच केलं गेलय . मोठ्या कंपन्या monopolist होतीलच . याचाच अर्थ competition , entreprenuership या अर्थशास्त्रातील मूळ संकल्पना नाकारल्या जातील का ? म्हणजे Capitalism धोक्यात आले असे होईल का ? अर्थशास्त्राचा सध्याचा पायाच ढासळेल का ?

आता भारतामध्ये आधार च्या स्वरूपात जगातील सर्वात मोठा database बनवला गेलाय . आधार linking मुळे  तो आपल्या social , political आणि economic गरजांशी जोडला गेलाय . व्यक्तिस्वातंत्र्य ही लवचिक संकल्पना अजूनच कमकुवत होईल  अशी भीती वाटण्यास वाव आहे . 

एक मात्र  pray करावे वाटते कि आधार चा डेटा कधी चोरी होऊ नये . असे झाले तर लोकशाही , अर्थव्यवस्था , व्याकरस्वातंत्र्य याही पेक्षा मोठा धोका निर्माण होऊ शकतो तो म्हणजे आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचा. George Orwell च्या Animal Farm आणि १९८४ या कहाण्या भारतात खऱ्या ठरू नये हि प्रार्थना . 

March 19, 2018

A silent revolution in making

A clash between a revolution and anti-revolution forces is imminent, it seems. It's dangerous especially when both revolution and its reaction aka anti-revolution are silent and underground.

Can we stop it?  Do we have any solution?

No solution is in the frame. But hope is there.


===================================================================




फ्रेंच राज्यक्रांती ने Liberty , Equality and Fraternity व अमेरिकन राज्यक्रांती  ने freedom and Rights ची बीजे रोवली. याचचेच प्रात्यक्षिक हे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात होत , भारतीय संविधान घडले . कौतुक कारण्याइतपत silent , peaceful and yet revolutionary . 



It has not achieved all the goals. In some cases goal post shifted, in few, it succeeded partially and in few, it supposedly fulfilled its goals.



Society and democracy churned each other and they are the reasons for failure or win for each other. This churning is leading to another silent revolution, underground anti-revolution.



But a fearful thought has come to mind, that a silent revolution and silent anti-revolution would be at war with each other.But such war would not be silent. If this cold war continues then Indian society would have to pay the big price. 



Any solution? No .. but we can hope; because this is the land which got independence with peaceful struggle. But the same land has witnessed a partition which cost more than a million lives, soon after independence. 



अभिमन्यु आणि अशे अनेक


अनेक ट्रॅप्स आपल्या भोवती असतात .. त्यात आपण कळत नकळत अडकतो .. असाच एक ट्रॅप , स्पर्धा परीक्षांचं .. त्याबद्दल .

============================================================================

अभिमन्यु 

सुभद्रा - अर्जुनाचा मुलगा , उत्तरेचा नवरा आणि कृष्णाचा भाचा याहीपेक्षा जास्त आपण अभिमन्युला ओळखतो ते महाभारतातील चक्रव्युव्हामुळे .   

           ज्या युद्धभूमीवर अर्जुन , कर्ण , भीम , द्रोण , दुर्योधन यांच्यासारखे रथी - महारथी आपली शौर्य गाथा लिहीत होते त्या युद्धभूमीवर आपल्या पराक्रमाचा ठसा उमटण्याची संधी अभिमन्यूला भेटली होती . इतिहास घडवण्यासाठीच अभिमन्युने चक्रव्युव्हात प्रवेश केला असणार. चिंतेचा पुसटसाही स्पर्श त्याला झाला नसणार . चिंतेऐवजी त्याला विजयश्री दिसली असणार . इतिहासात न पुसले जाणारे नाव कोरलेले त्याला दिसले असणार . यानेच तो नकळत आंधळा झाला असणार . दुर्दम्य आशावाद हाच त्याच्या वीर (हकनाक) बळीचे कारण असणार. मरणातही तो अमर झाला . पराभवातही  इतिहासात त्याचे नाव कोरले गेले हे खरे . सर्व अभिमन्यू हे तितके सुदैवी नसतात .   

          अर्धवट ज्ञान , अपुरी तयारी , अतिआत्मविश्वास अथवा नियतीचा करार , कारण काहीही असो . धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर एक अभिमन्यु हकनाक बळी पडला . कदाचित त्याचा खून च झाला . असे कितीतरी अभिमन्यु स्पर्धापरीक्षा -upsc च्या चक्रव्युव्हात अडकले असतील ; कधीच बाहेर न पडण्यासाठी . 

मुकमोर्चे त्यांचा आवाज , परिणाम आणि बरच काही

मुकमोर्चे जेव्हा न सोसणारा आवाज करत होते , राज्यकर्ते व राजकारणी जेव्हा बहिरे होऊन आयत्या तव्यावर पोळी भाजत होते आणि  जेव्हा पुरोगामी महाराष्ट्र हा काळामागे दशको वर्ष जात होता , त्या वेळचे वैचारिक गोंधळ , काही आशावाद , मग दुर्दम्य का असेना 


==============================================



मूक मोर्चे गाजत होते. त्यांचा आवाज अस्वस्थ करणारा होता . प्रस्थापितांना आणि विस्थापितांनाही . 

बहुजन समाजाचा पाया ज्या मराठा समाजाने रचला त्याच बहुजन समाजात आता मराठा समाज नाही . मराठा विरुद्ध दलित , मराठा विरुद्ध कुणबी etc  असे अनेक फुटी बहुजन समाजात पडल्यात . divide and rule : म्हणजे फोडा आणि राज्य करा हे तत्व आपल्या सर्वच राजकारण्यांनी स्वातंत्र्याच्या मध्यरात्रीच अंगिकारले असे वाटते . त्याचाच परिपाक म्हणजे  बहुजन समाजाचे विभाजन आणि अनेक मोर्चे  . 



१९३१ मध्ये पूना करार हा  इंग्रजांनी भारतीयांवर लादलेला divide and rule चा एक भाग होता असे अनेक स्वातंत्र्य सेनानींचे मत होते . त्यांच्या मते seperate electorate हि मागणी म्हणजे काँग्रेस आणि स्थानिक समाज व्यवस्था यांना कमजोर करण्याची चाल वाटत होती .  "Dr . आंबेडकर हे दलित उद्धारासाठी जितके emotional होते तितकेच rational हि असावेत . त्यामुळेच या मागणीचा संधीसारखा वापर त्यांनी करून घेतला . He was astute politician and he used divide and rule policy in his favour for the  benefit of his constituency i.e. दलित ", असे अनेक इतिहासकारांचे मत होते . जर तात्कालिक राजकारणी म्हणून विचार केला तर यात काहीही वावगे नसावे . 



त्याच वेळी एक महात्मा सत्य , अहिंसा etc वैश्विक भाव जनतेवर बिंबवण्याचा प्रयत्न करत होता . त्या वेळची जनता ऐकणारी होती , संवेदनशील होती . दूरगामी परिणामांच्या विचारांतीच त्यांनी उपोषण केले . इतिहासकारांच्या मते गांधींजीना वाटे की,  "seperate electorate  will divide indian society in irreversible manner and with it dalit can never be part of mainstream society". 



According to historians," Dr. Ambedkar was giving voice to the voiceless section of society. At the same time, a Mahatma was opposing separate electorate. They have reasons. One was fighting for reality then and other was fighting for the eternal ideals. In a way, both were fighting for good of same people, for the same end but their means were different". हि महापुरुषांची लढाई माझ्यासारख्या सामान्य माणसांच्या बौद्धिक कुवती बाहेरची असावी.





Now history is getting repeated. People are peacefully protesting, on every platform from the road to the social networks. Muk Morcha like an earthquake has further weakened already weak social fabric. The unanticipated resultant is further consolidation of the caste system.  This is what Gandhi feared.



Politicians are encashing the situation. But on the broader front, two things are missing. Muk Morcha does not have a leader like Ambedkar; an astute politician who fights for his people. And the country is missing spiritual, stubborn and astute leader like Mahatma who fights for all.   

सो ऽहम्


कोहम  याचे उत्तर सोहम असे असेल तर .. मग तो   सोहम काय , तर तो असा 



स्वप्न आणि मी



मी स्वतःला नायक बनवत होतो
मी रमलो होतो, गुंतलो आणि गुंगलो हि होतो
पुन्हा डोळे गच्च मिटून मी झोप  लांबवीत, स्वप्न रंगवीत होतो

जेव्हा जाग आली ,

जे सुंदर होतं ते फक्त स्वप्नच होतं
आणि मागे राहिलं होतं ते सारं, मी .

बाकी शून्य

बाकी शून्य हे काही विशेष आवडल नाही . तरी काही विचार मनात गोंधळ घालत होते . जसे की 

==============================================

बाकी शून्य हे सर्व काही ठीक आहे . मग असं माहीत असतानाही आपण का झटत असतो ? जग हे जर माया असेल आणि सर्व काही असेलही आणि नसेलही असे असेल तर मग इतका उदव्याप कशासाठी ? आपल्या विजयाचा उन्माद घडवण्यासाठी कि पराभवाचे समर्थन करण्यासाठी ? पराभव झाला तर सहसा जाहिरातीची गरज जास्त असते म्हणूनच बाकी शून्य पुस्तक तयार होते का ? कि पुन्हा अभिमन्यु  पराभूत होऊ नये म्हणून मार्गदर्शनासाठी ?

अजून एक , बाकी शून्य होतंच असते की तसे व्हावे म्हणून आपण प्रयत्न करत असतो ? वा आपल्यापासून असेच काही घडते अथवा घडवले जाते ज्यात बाकी शून्यच राहते ? म्हणजे बाकी शून्य हीच नियती का ? जर तसे असेल तर इतके पुस्तक लिहिण्याचा आणि आम्ही ते वाचण्याचा अट्टहास का केलेला असावा ?

भविष्यातला Status quoist or revolutionary ?


बऱ्याच वेळा आता संविधानाच्या शपथा घेतल्या जातात .  काही दिवसांपूर्वी मला एक विवाह सोहळा attend करण्याचा योग्य आला त्यात संविधानाने धर्मग्रंथाची जागा घेतली . मला प्रथमदर्शी हे आवडलेही . 



मग नंतर एक विचार आला जर संविधान हे धर्मग्रंथ झाले आणि Dr आंबेडकर हे देव झाले तर .. भक्त हेच देव निर्माण करतील . मग आधुनिक देवळं आणि अनंत प्रकारचे बडवे हि येतील . मग संस्था आणि संस्थान तयार होतील . मग या संस्था , संस्थाने आणि संस्थाचालक हे नव प्रस्थापित व्यवस्था टिकवण्याचा प्रयत्न करतील . Status Quo हा त्यांना फायदेशीर असतो . 



जर असे झाले तर , १९४०-५० च्या काळानुरूप बनवलेले संविधान हे अप्रचलित obsolete होईल . प्रस्थापित व्यवस्था संविधानात थोडे फार बदल घडवेल , फक्त safety valve म्हणून . पण ते बदल काळानुरूप नसतील , ते दशकांनी काळामागे असतील . आणि मग हळूहळू संविधान हे rigid होईल . जर असे झाले तर मनुस्मृती आणि संविधान यामध्ये काय फरक राहील ?



जर तर च्या दुनियेत कधीतरी constitution चे हि दहन होईल का ? आणि तसे होत असताना मी कुठे असेल ? कोण असेल ? आणि का असेल ? 



मी status quoist असेल कि revolutionary ?

स्मशानातील सोनं


स्मशानातील  सोनं 
=============================

खांदे देणारे वाढलेत 
आणि टाळूवरचे लोणी खाणारेही 

बदल जागोजागी झालाय 
आता मुडदे जीवंत आनंदी वगैरे जाणवतात 
पण काही उद्वीग्न असहाय दुखी होऊन 
थडग्यात बंदिस्त आहेत 

अशा बंदिस्त थडगेखोरांना एक बाब खटकते आहे 

जी पूर्वी स्मशान होती 
ती आता बाग आहे 





========================================================================
स्मशानातील  सोनं २:

Featured post

सो ऽहम्

कोहम  याचे उत्तर सोहम असे असेल तर .. मग तो    सोहम काय , तर तो असा 

Popular हि काही